Breaking News

नगरमध्ये ईदची नमाज उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी
शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मुस्लीम बांधवांचा ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त शहरातील तख्ती दरवाजा, पाचपीर चावडी, मुकुंदनगर, फकीरवाडा, कोठला स्टॅण्ड परिसरासह विविध भागात राहणार्‍या मुस्लीम बांधवांनी कोठला स्टॅण्ड येथील ईदगाह मैदान या भागात ईदचे नमाज पठण केले.
यावेळी नगर- औरंगबाद  मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. ती वाहतूक भिंगारच्या दिशेने वळविण्यात आलेली होती. महामार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली होती.
यावेळी कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, मुस्लीम बांधवांनी ईदच्या पूर्वसंध्येला नगरच्या बाजारांमध्ये जोरदार तयारी केली होती. मुस्लिम बांधवांनी बाजारात खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मुस्लिम समाजातील लोकांनी विविध पेहरावांसह खाद्यपदार्थांची मोठी खरेदी केली होती. सर्व बाजारात ईद सणानिमित्त आनंदाचे वातावरण होते.
सोशल मीडियाद्वारे लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून मुस्लिमांमध्ये ईद साजरी केली जाते.
श्रावणी सोमवार आणि त्यातच मुस्लीम बांधवाचा ईद सण यामुळे हिंदू-मुस्लीम एकतेचे सर्वत्र वातावरण पहायला मिळाले होते.