Breaking News

संततधार पावसाने अकोल्यात नुकसान पट्टा फोटो

राजूर/प्रतिनिधी

 अकोले तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिके सडू लागली असून शेतीचे बांध फुटले आहेत. पांजरे गावात घरांचे पत्रे उडाल्याने तेथील गावकऱ्यांनी त्यांचे धान्ये दुसऱ्या ठिकाणी हलवले आहेत. भिंतीस तडे गेले आहेत. जनावरेही पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासकीय मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.