Breaking News

'रेसिडेन्सील'मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक


अहमदनगर/प्रतिनिधी

 शहरातील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधात्मक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. अग्निशामक यंत्रणेद्वारे आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके दाखवली.

  यावेळी इमारतीस आग लागल्यानंतर करावयाची कार्यवाही, पूर, भूकंप, वीज आदी नैसर्गीक आपत्ती मधून स्वतःचा व इतरांचा बचाव कशा पद्धतीने करावा आदींची प्रात्यक्षिके दाखविली. जखमींना कशा पद्धतीने ट्रीट करावे, अग्निशामक, पोलीस, रुग्णवाहिका आदींना कशा पद्धतीने सूचना व माहिती द्यावी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 यामध्ये विद्यार्थ्यांना फायर ऑफिसर घाटवीसावे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. यावेळी कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दोडके ए.आर. होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव घुंगार्डे सर यांनी केले. यामध्ये अग्निशमन यंत्रणेचे भांगरे चिंधू, सोलट, पडगे, कांडेकर आदींनी परिश्रम घेतले.