Breaking News

हृदयरोगासंदर्भात कर्मवीर प्रतिष्ठानचे उपक्रम स्तुत्य : कुदळे

कोपरगाव/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांचे आपल्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष मोठ्या आजारांना निमंत्रण असते. कोणत्याही आजाराचे निदान किंवा उपचार घेण्यासाठी कोणत्या डॉक्टरची मदत घ्यावी. अशावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून या रुग्णांसाठी ही शिबिरे मोठा आधार ठरतात. त्यामुळे कर्मवीर प्रतिष्ठानचा हृदयरोग तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी केले.

 कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार (दि.१३) रोजी कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील रवंदे आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

   यावेळी वोक्हार्ट हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.महेश पाटील यांनी उपस्थित रुग्णांची मोफत तपासणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मा. व्हा.बाळासाहेब कदम होते. याप्रसंगी पद्माकांत कुदळे, संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोक मुरलीधर काळे, विठ्ठलराव आसने, अरुण चंद्रे, नारायण मांजरे, पुंडलिक माळी, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, सदस्य श्रावण आसने, छगनराव देवकर, शांताराम सांगळे, विलास दवंगे, गोरख दवंगे, माधवराव खिलारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर आव्हाड यांनी केले. उपसभापती अनिल कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी तर आभार गोरख दवंगे यांनी मानले.