Breaking News

बजाज यांच्याकडून पिंपळवाडी विद्यालयास बेंच भेट

कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राशीन येथील उद्योजक मेघराज बजाज यांच्याकडून पिंपळवाडीच्या न्यू इंग्लिश स्कूलला २५ बेंचचे मोफत वितरण करण्यात आले. बजाज यांनी विद्यालयास सरप्राईज व्हिजिट देवून खाऊचे वाटप केले. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत तांबे यांनी केले. शाळेच्या वतीने उद्योजक मेघराज बजाज, व्यवस्थापक राजेंद्र साखरे व सर्व सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक जाधव यांनी बजाज यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांचे आभार मानले.

 बजाज यांनी भाषणात बालपणीच्या आठवणी जागवल्या. त्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केल्याचे ते म्हणाले. पुढे फर्निचर व्यवसायात पदार्पण करून अनेकांना रोजगार दिला याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आप्पासाहेब पाटील, कल्याण भोंडवे, दादासाहेब पोटरे, सुनिल पोटरे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनाथ दिवटे यांनी आभार मानले.