Breaking News

पूरग्रस्तांसाठी पारनेरकरांची मदत

पारनेर/प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना नागेश्वर मित्र मंडळ तसेच पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने 'एक हात मदतीचा' या संकल्पनेमधून आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या वतीने पुरग्रस्तातील लोकांच्या मदतीसाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्षा वर्षा, पत्रकार विनोद गोळे, मा.सरपंच बाळासाहेब नगरे, दीपक नाईक, योगेश मते, दादा शेठे, महेंद्र मगर, सतीश पिंपरकर, संदिप घोडके, तसेच नागेश्वर मित्र मंडळ, पारनेर व पारनेर तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.