Breaking News

सहकारी बँकांतील लेखनिकांची कार्यशाळा

 अहमदनगर/प्रतिनिधी

 अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन आयोजित नागरी सहकारी बँकांतील लेखनिकांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेचे उदघाटन कार्यशाळेतील सहभागी निरीक्षक प्रशिक्षणार्थी अहमदनगर मर्चंट को-ऑप बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सुरेश फिरोदिया व वरिष्ठ अधिकारी राजश्री अल्लडवार यांच्या हस्ते झाले.

  अशिक्षितपणा, सुशिक्षितपणांच्या व्याख्या आता कालबाहय झाल्या आहेत. कालचे तंत्रज्ञान आज शिकणारे अशिक्षित व आजचे तंत्रज्ञान आज शिकणारे सुशिक्षित अशी सदयस्थितीतील व्याख्या बनली आहे. त्यादृष्टीने बँकिंग क्षेत्रातील आजच्या तंत्रज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान अदययावत ठेवले तरच हे क्षेत्र अधिक बळकट होईल त्या दृष्टीने सतर्क राहण्याचा निर्धार नागरी सहकारी बँकांतील लेखनिकांच्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

  अहमदनगर शहर सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अनासपुरे यांनी संतुष्ट ग्राहक, बँक व्यवसाय वृध्दी या विषयावर मार्गदर्शन केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथा राऊत यांनी स्वागत केले. कार्यलक्षी संचालक अशोक कुरापाटी यांनी आभार मानले