Breaking News

हिंगोलीत दोन गटात दगडफेक;

तीन जखमी, बंदोबस्तात वाढ

हिंगोली / प्रतिनिधी
हिंगोली-औंढा मार्गावर दोन गटात झालेल्या वादातून हिंगोली शहरात आज अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात तीन जण जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन गटांतील वादानंतर शहरातील नांदेड नाका परिसरात ट्रॅव्हल्स, कार, टेम्पो व दुचाकीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. खासदार हेमंत पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेक व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.