Breaking News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘जायंट्स ग्रुप’चे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी
“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जायंटस् ग्रुपने  नागरिकांना मदतीचे आवाहन केले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपात ही मदत स्वीकारली जाणार आहे’’, अशी माहिती जायंट्स इंटरनॅशनलचे संचालक संजय गुगळे यांनी दिली.
 सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातले असताना अनेक गावे पाण्याखाली गेली असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना मदतीची गरज असून, जायंट्स ग्रुप वस्तू स्वरुपात त्यांना मदत पाठविणार आहे. ब्रश-पेस्ट, हेअर ऑईल, साबण, जुने-नवे  चांगले कपडे (स्वेटर, टी शर्ट/शर्ट), अंथरूण-पांघरूण, अन्न-धान्य, बिस्किटे, पाणी बॉटल, औषधे आदींसह जीवनावश्यक वस्तू येत्या 4 ते 5 दिवसात देण्याचे नगरकरांना आवाहन करण्यात आले आहे. ही मदत अजय मेडीकल, बुरुडगाव रोड येथे देण्यात यावी. अधिक माहितीसाठी संजय गुगळे (मो.9822070018) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.