Breaking News

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत संवर्गातील कर्मचार्‍यांचे उपोषण

अहमदनगर/प्रतिनिधी
“जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासन स्तरावर दुर्लक्ष होत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.9) संयुक्तपणे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण जिल्हा परिषद आवारात करण्यात आले.
यापूर्वी संघटनेने घंटानाद आंदोलनाची नोटीस देताना प्रमुख मागण्यांचा उल्लेख केला होता. परंतु शासन पातळीवर याची योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ, जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसाय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन संघटना व सर्व मित्र संघटनेतील जिल्हा परिषद कर्मचारी हे एक दिवसाचे उपोषण सहभागी झाले होते.
सातवा वेतन आयोगातील खंड 2 अहवालातील वेतन त्रुटी, लिपिक लेखा परिषद वाहन चालक आरोग्य पशूसंवर्धन महिला व बालकल्याण स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आरेखक व इतर संवर्गातील त्रुटी दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, महाराष्ट्र विकास सेवा पदोन्नतीमध्ये कोटा वाढवावा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीमधील टक्केवारीची अट रद्द करून त्वरित शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी. वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये पदोन्नती शैक्षणिक अर्हतेनुसार द्यावी. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे संगणक, घरबांधणी अग्रीम मंजूर करावे. वाहनचालक व परिचर यांना पाच हजार रुपये गणवेश अनुदान द्यावे, प्रशासन अधिकारी वर्ग 2 चे पदे निर्माण करावे, 50-55 वर्षे वैद्यकीय तपासणी दाखले परिपत्रक रद्द करणे, अपील व वर्तणूक नियम सुधारित करावे, चौकीदार पद निर्माण करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व गट शिक्षण अधिकारी स्तरावर वरिष्ठ सहायक पदे निर्माण करावी, गुणवंत कर्मचार्‍यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करावे, या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आले. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन, सुभाष कराळे, राज्य समन्वंयक, विकास साळुंके, जिल्हाध्यक्ष, किशोर शिंदे, जिल्हा सचिव व जिल्हा परिषद संवर्गीय कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष, लेखा सवंर्ग यशवंत सालके, वाकचौरे, एम.पी.कचरे, संजय कडूस, शशिकांत रासकर, ए.वाय.नरोटे, सोमनाथ भिटे, बाळासाहेब खुळे, राधेश्याम सपकाळे, के.के.जाधव, राजेंद्र म्हस्के, हेमंत कुलकर्णी, चंद्रकांत वाकचौरे यांनी केले होते.