Breaking News

रायफल स्वच्छ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू

गडचिरोली
रायफल स्वच्छ करीत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलिस जवानाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. संजीव रामय्या शेट्टीवार (30) रा. नरसिंहापल्ली असे मृतक जवानाचे नाव आहे. संजु शेट्टीवार हे सिरोंचा पोलिस ठाण्यात क्युआरटी पथकात कार्यरत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी रायफल स्वच्छ करीत असताना अचानक गोळी सुटून संजीव शेट्टीवार यांना लागली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.