Breaking News

केरळला केंद्र सरकारच्या मदतीची गरज : राहुल गांधी

वायनाड
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या केरळच्या दौर्‍यावर आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाड लोकसभा मतदार संघातील पूरग्रस्त भागास भेट दिली आहे परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांची विचारपूस केली तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण देखील केले.
मदत शिबिरात वास्तव्यास असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, वायनाडचा खासदार म्ह्णून मी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे केले असून राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे तसेच केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून मदतीचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी काल वायनाड लोकसभा मतदारसंघातीलस्थानिक अधिकार्‍यासबत बैठक केली आणि स्थितीचा आढावा घेतला आणि राज्यातील पूर परिस्थतीवर चर्चा केली. सध्या केरळासह अन्य राज्यात अतिवृष्टीने सर्वत्र भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणार्‍या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे.