Breaking News

कर्जतच्या मुलींनी पाठविल्या जवानांना राख्या

कर्जत/प्रतिनिधी
रक्षाबंधन सणानिमित्त कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या सोनमाळी कन्या विद्यामंदिरच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे ९०० राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर विविध संदेशही पाठविण्यात आले आहेत.

  बहुतांश मुलांनी स्वत: कलाकुसर करून राख्या केल्या आहेत. विकतच्या राख्यांपेक्षा आपण रंगीबेरंगी कागद, टिकल्या, दोरे, लोकरीचे धागे, बिया, असे हाताशी असेल ते साहित्य वापरून स्वत: केलेल्या या राख्या जवानांना पाठविल्या. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये सैनिकांप्रति आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील.हा हेतू समोर ठेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती आशिष निंबोरे यांनी दिली.