Breaking News

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची रणजीत देशमुखांची मागणी

नागपूर / प्रतिनिधी
राज्यातील पूरस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभेसह राज्यातील सर्व निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकलून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी  काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी केली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी हानी  झालेली आहे. पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुका व पुनर्वसन एकाचवेळी शक्य नाही. त्यामुळे  निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकला,’ अशी  मागणी त्यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.