Breaking News

पाथर्डीकर सरसावले पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

पाथर्डी/प्रतिनिधी
 सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दैनंदिन उपयोगी वस्तु, रोख नगद देण्यासाठी सर्व पक्षीय मदत फेरी शहरातून काढण्यात आली. मुसळधार पावसाने अनेक गावे पाण्याखाली बुडाली आहे. त्यात गेल्या सात दिवसापासून महापुराच्या परिस्थितीशी झुंज देणार्‍या नागरिकांना माणुसकीच्या भावनेतून मदतीचे आवाहन पाथर्डीकरांनी करताच 1 लाखापेक्षा जास्त रक्कम अवघ्या काही तासात गोळा करण्यात आली आहे.
 यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, भारतीय जनता पार्टी राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंद गर्जे, माजी सभापती संभाजी पालवे, आदिनाथ महाराज आंधळे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतीक खेडकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश चितळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फारूक शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे नासिर शेख, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, युुवा नेतृृृत्व प्रशांत शेळके, नीतीन गटांनी, सतीश तरटे, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के उपस्थित होते.
  शहरातील नवीपेठ येथून निघालेली मदत फेरी क्रांती चौक, अजंठा चौक, मेनरोड, नाईक चौक, कोरडगाव चौक मार्गे नगररोड येथील शासकीय विश्रामगृहावर पूरग्रस्तांना पाठवण्यात येणारे कपडे, धान्य इतर संसार उपयोगी वास्तूचे एकत्रित करून मालवाहू गाडीत ठेवण्यात आल्या. यादरम्यान सुमारे एक लाखांची रोख रक्कम शहर वासियांकडून देण्यात आली. पुरग्रस्तांसाठी मदत करण्याची इछा असल्यास शहरातील भगवान गॅस एजन्सी येथे संसार उपयोगी वस्तू देण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चाचे तालुकध्यक्ष अमोल गर्जे यांनी केले. शहरातील मुस्लिम बांधवाकडून पूरग्रस्तांसाठी बकरी ईद निमित्त इदगाह मैदान येथे सुमारे 50 हजार रुपये निधी संकलित करण्यात आला. यावेळी मौलाना सैफउद्दीन, दादाभाई चौधरी, राजू पठाण, जमीर, शमाली पठाण, फारूक शेख, बब्बू शेख, जुनेद पठाण इत्यादी लोकांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले आहे.