Breaking News

क्रिकेट मंडळ येणार ‘नाडा’च्या कार्यकक्षेत

मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने राष्ट्रीय प्रतिबंधित द्रव सेवन विरोधी संस्थेच्या (नशनल अँटी डोपिंग एजन्सी- नाडा) कार्यकक्षेत येण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्रीय क्रीडा सचिवांनी ही माहिती दिली आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील ही फार महत्त्वपूर्ण घटना आहे कारण आतापर्यंत बीसीसीआय ‘नाडा’च्या कक्षेत येण्यास विरोध करत होती. अलीकडेच बीसीसीआयने ज्या पध्दतीने पृथ्वी शॉ व इतर दोन खेळाडूंवर प्रतिबंधित द्रव सेवनप्रकरणी निलंबनाची कारवाई केली त्यावर बरीच टिका झाली होती.