Breaking News

चुकीच्या माहितीद्वारे बदली केल्याच्या निषेधार्थ ठोंबे यांचा उपोषणाचा इशारा

भिंगार/प्रतिनिधी
चुकीच्या माहितीद्वारे शिक्षक बदली अन्यायकारक असून 15 ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मोहन ठोंबे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बन्सी ठोंबे उपअध्यापाक या पदावर पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत असताना चुकीच्या माहितीच्या आधारे बोरुडे या शिक्षकाने  सवंर्ग-2 शिक्षक प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरी. ता. पाथर्डी या ठिकाणी बदली झाली असून आपली बदली चांगदेवनगर (ता.राहाता) या ठिकाणी झाली.
याबाबत जिल्हाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सर्व पुराव्यानिशी कागदपत्रे सादर केली असून त्यात म्हटले आहे की, बोरुडे या शिक्षकाने सवंर्ग 2 पती-पत्नी यामधून बदली अर्ज भरला असून त्यांची पत्नी शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ या ठिकाणी शासकीय सेवेत  आहेत. मिरी ते खुंटेफळ हे अंतर 39 किमी आहे. नियमानुसार 30 किमी आतील  शाळेची निवड करणे ठीक असते. शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर चौकशी न करता निर्णय घेतल्यामुळे विनंती अर्ज देऊनही योग्य निर्णय न झाल्यामुळे 15 ऑगस्टला  उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बन्सी मोहन ठोंबरे यांनी दिला आहे.