Breaking News

‘नगर अर्बन’च्या प्रगतीत कर्मचार्‍यांचे बहुमोल योगदान : सुभाषचंद्र मिश्रा

अहमदनगर/प्रतिनिधी
“नगर अर्बन बँकेची सूत्रे 1 ऑगस्टपासून हाती घेतल्यानंतर बँकेच्या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. नगर अर्बन बँक मजबूत स्थितीत आहे. बँकेची चांगली प्रगती झाली आहे. या प्रगतीत कर्मचार्‍यांचे योगदान बहुमोल आहे. अर्बन बँकेप्रमाणेच अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीही चांगली प्रगती करत आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना चांगली सेवा मिळत आहे’’, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले.
नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडीट सोसायटीची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी या सभेत उपस्थित कर्मचारी सभासदांना मार्गदर्शन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस क्रेडीट सोसायटीचे चेअरमन वसंत कुसमुडे, व्हाईस चेअरमन हरिभाऊ हिरणवळे, प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, सतीश रोकडे, एम.पी.साळवे, डी.के.साळवे, सुनील काळे, मनोज फिरोदिया, राजेंद्र डोळे आदी वरिष्ठ अधिकार्‍यांसह क्रेडीट सोसायटीचे संचालक बाबासाहेब मगर, प्रसाद ठोसर, भारती मुत्याल, सविता देसर्डा, अप्पासाहेब थोपटे, सचिव अतुल भंडारी, सहसचिव स्वप्नील भणगे आदींसह बँकेच्या 48 शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन वसंत कुसमुडे म्हणाले, “नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीच्या प्रगतीत संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांचा मोठा सहभाग आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना सवलतीच्या दरात आर्थिक पुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. कर्मचार्‍यांनीही भरपूर सहकार्य केल्यामुळे सोसायटीच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीच्या प्रगतीसाठी मिळालेले सहकार्य, प्रेम व वात्सल्याच्या ऋणातूनच राहून पुढील काळात अधिक चांगले काम करणार आहे.’’
प्रमुख व्यवस्थापक एम.पी.साळवे म्हणाले, “कर्मचार्‍यांच्या योगदानामुळे नगर अर्बन बँक आज उभी आहे. कर्मचारी हे बँकेचे प्रमुख घटक आहेत. सर्व वरिष्ठ अधिकारी व इतर अधिकार्‍यांनी मिळून ही बँक पुढे येण्यासाठी कटिबद्ध व्हावे. बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा सर्व कर्मचार्‍यांना सहकार्य करतीलच.’’
क्रेडिट सोसायटीचे सचिव अतुल भंडारी यांनी अहवाल वाचन केले. व्हाईस चेअरमन हरिभाऊ हिरणवाळे यांनी आभार मानले. बाळासाहेब ओतारी यांनी सूत्रसंचालन केले.