Breaking News

महावीर चषक परिवाराचे कार्य कौतुकास्पद

अहमदनगर/प्रतिनिधी
“सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली व कराडमध्ये आलेल्या पुराचे भीषण स्वरूप पाहून तेथील आपदग्रस्तांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. शासन त्यांच्या परीने मदत करत असले तरी  सामाजिक भान जोपासणार्‍या महावीर चषक परिवाराने पूरग्रस्ताना दिलेली मदत लाख मोलाची असून त्यांचे कार्य  कौतुकास्पद आहे’’, असे मत मर्चंट बँकेचे अध्यक्ष सीए. अजय मुथा यांनी केले.
महावीर चषक परिवारातर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी रेडीमेड कपडे, बिस्किटे, काडेपेटी व मेणबत्या आदी साहित्य मदत म्हणून समन्वयक जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व रोहित चंगेडीया मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍याकडे  मर्चंट बँकेचे अध्यक्ष सीए.अजय मुथा व बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे उपाध्यक्ष सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मर्चंट बँकेचे माजी संचालक मीना मुनोत, बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे सचिव विशाल शेटीया, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, जायंट्सचे संजय गुगळे, अनिल गांधी, सुधीर लांडगे, अभय मुथा, कुणाल भंडारी, पवन शिंगवी, नवीपेठ धर्मशाळेचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, आदर्श व्यापारी मंडळाचे राजेंद्र तातेड, सुयश पोखरणा,अजय गुगळे, अतुल शेटीया, प्रीतम पोखरणा, अनिल दुग्गड, डॉ.सचिन बोरा, विकास सुराणा, रुपेश भंडारी आदी उपस्थित होते.