Breaking News

जीवनदीप खर्डी महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न!!

शहापुर 
 जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे, दि 09 ऑगस्ट 2019 रोजी  जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रा.डी. एम. भुताळे (समाजशास्र विभाग) व महाविद्यालयाचे प्राचार्य के. आर. कळकटे सर उपस्थित होते.     
आजच्या या आदिवासी दिनानिमित्त प्रा.डी.एम. भुताळे सरांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्व सांगून, आदिवासी समाजाची पार्श्‍वभूमी त्यांचे जीवनसंघर्ष, त्यांच्या समस्या, वर्तमानस्थितीत त्यांचे असणारे समाजातील स्थान याविषयावर भाष्य केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य  के.आर. कळकटेसरांनी, आदिवासी सुशिक्षित पिढीने आपल्या समाजाची कला व संस्कृती साहित्य, चित्र, स्थापत्य इत्यादींच्या माध्यमातून जोपासावी असे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केले. 
विद्यार्थी मनोगतामध्ये कु. नरेश निचिते (ऋधइलेा), कु. धनंजय ढगे (डधइलेा), मयुरी पवार (ऋधइलेा) यांनी आदिवासी दिनानिमित्त भाषण केले तर कु. श्रीकांत पंडित (ढधइलेा) या विद्यार्थ्याने ‘आदिवासी गीत’ सादर केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा मडके यांनी केले तर आभारप्रदर्शन  प्रा. कामिनी विशे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व 150 विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.