Breaking News

सुपे औद्योगिक वसाहतीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

 शिवसेना युवा तालुका प्रमुखांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे;तिघांना अटक


पारनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारी मिळण्यावरून दोन गटांत बाचाबाची झाली व त्यांचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. शनिवारी दुपारी ३.३० वाजता घडली. यावेळी पोलिस प्रशासनास तरुणांना पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला.

 याबाबत योगेश बाबाजी परांडे यांच्या फिर्यादीवरून युवा सेना तालुका अध्यक्ष नितीन शेळके (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर),राहुल यादव (रा.यादववाडी ता.पारनेर),अजय विठ्ठल शेळके,विजय विठ्ठल शेळके (दोघे.रा.नारायणगव्हाण ता.पारनेर),किशोर यादव (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर),राहुल ढोरमले,तुषार ढोरमले (दोघे.रा.जातेगाव ता.पारनेर),तुषार गुजर (रा.गुजरमळा ता.शिरूर जि.पुणे),केतन मल्लाव (रा.शिरूर जि.पुणे) यांच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तुषार ढोरमले, राहुल ढोरमले, विजय शेळके या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

     दरम्यान सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये म्हसणे फाटा परीसरात मोठ- मोठे उद्योग उभारणीचे काम सुरू आहे.याठीकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक असताना बाहेरच्या लोकांनी विविध कंपन्यांमध्ये कामाचा ठेका घेतला आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच वाद निर्माण झाले आहेत. एका महिन्यात वाद होण्याची ही तिसरी घटना आहे. यावर पोलिस प्रशासनाने ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहेत.