Breaking News

‘वंचित’ला विधानसभेच्या निवडणूकीसाठी ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह

संभाजी ब्रिगेडला ‘शिलाई मशीन’ चिन्ह बहाल

नवी दिल्ली
महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबंरमध्ये होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, त्यांनी राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीला विधानसभेच्या निवडणूकीसाठी गॅस सिलेंडर या चिन्हाचे वाटप केले आहे.
निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह बहाल केले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह देण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीत या पक्षांनी उमेदवार उतरवल्यास त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन असेल. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हं यापूर्वीचीच असतील. जसे काँग्रेसचा पंजा, भाजपचं कमळ, शिवसेनेचा धनुष्यबाण, राष्ट्रवादीचं घड्याळ, मनसेचं रेल्वे इंजिन अशी चिन्हं असतील. महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे.


राजकीय पक्षांना दिलेले चिन्ह
वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलेंडर, संभाजी ब्रिगेड - शिलाई मशीन, महाराष्ट्र क्रांती सेना - हिरा, हम भारतीय पार्टी - ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टी - किटली, भारतीय जनसम्राट पार्टी - टेलिफोन