Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलवर सर्वसामान्यांचा विश्वास: मुनोत

अहमदनगर/प्रतिनिधी

 आज धावपळीचे जीवनमानामुळे प्रत्येक मनुष्य व्याधीने ग्रासलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आज आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यासाठी नियमित आरोग्य तपासणी करुन घेऊन वेळीच उपचार केल्यास आपले आरोग्य निरोगी राहू शकते. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने सर्वसामान्यांना विविध शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येते ही समाजाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे. दिवसेंदिवस सर्वसामान्यांचा विश्वास आनंदऋषीजी हॉस्पिटलवर वाढत आहे असे प्रतिपादन मर्चंटस् बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी केले.

  राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित मोफत न्युरोलॉजी तपासणी शिबीराचे उद्घाटन हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  संयोजक मोडालालजी जगन्नाथ बायड (महावीर ग्रुप), व परिवार मर्चंटस् बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाषलाल बायड, ईसीएचएस पॉलिक्लीनिकचे निवृत्त कर्नल आनंद स्वरुप,  मर्चंटस् बँकेचे संचालक आनंदराम मुनोत, किशोर गांधी, अमित मुथा, श्रीमती मीनाताई मुनोत, न्युरोलॉजिस्ट डॉ.गौतम काळे, डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, आशिष भंडारी, सतीश(बाबूशेठ) लोढा आदि उपस्थित होते.

            प्रास्तविकात  डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले, आम्ही राबवत असलेल्या या शिबीराच्या माध्यमातून दानशूरांच्या शाबासकीमुळे एक प्रेरणा मिळते. आणि नव्या उमेदीने शिबीरे घेण्यास मदत होते. बायड परिवाराचे काम मोलाचे आहे. या आरोग्य मंदिरात होणार्या  शिबिरांमुळे गरीब व गरजु रुग्णांना जो लाभ मिळतो, त्यांचे मोठ समाधान आम्हाला मिळत आहे. अत्याधुनिक मशिनरीद्वारे उपचार करुन रुग्णांना दिलासा देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कर्नल आनंद स्वरुप यांनीही हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव करुन शिबीरासाठी शुभेच्छा दिल्या.

               न्युरोलॉजी विभागाबद्दल माहिती देतांना संतोष बोथरा म्हणाले की, डोकेदुखी, अपस्मात, पॅरेलिसीस, कंबरदुखी, नसांचे विकार, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांवर उपचार करण्याकरिता मेंदूविकास तज्ञ डॉ.गौतम काळे उपलब्ध आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये सिमेन्सचे जागतिक दर्जाचे नामांकित कंपनीचे एमआरआय मशिन 1.5 टेस्लाचे मशिनद्वारे एमआरआय अत्यल्प दरामध्ये केले जाते. सिमेन्स कंपनीचे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक 16 स्लाईस सोम्याटोम स्कोप सीटी स्कॅन मशिन उपलब्ध, सीटी स्कॅन, सीटी अॅ न्जीओग्राफी, ईईजी इ. तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जातात.

  या शिबीरात 154 रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. आज (शुक्रवार) स्त्री रोग, व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे.