Breaking News

सीबीआयच्या कार्यशैलीवर सरन्यायाधीशांचे सवाल

नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोईं यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्रभाव आणि कार्यशैलीवर सवाल उपस्थित केले आहेत. या वेळी बोलताना गोगोई यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे सीबीआय आपली जबाबदारी चोख पार पाडू शकत नाही, असा रेशमी चिमटा काढला.

सीबीआयद्वारे आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सीबीआयच्या कामकाजात होणार्‍या राजकीय हस्तक्षेपावर चिंता व्यक्त केली. या वेळी त्यांनी असे का होते, की ज्या वेळी राजकीय हस्तक्षेप नसतो, त्या वेळी सीबीआय चांगले काम करते, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
गोगोई म्हणाले, की ज्या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो, त्या प्रकरणात सीबीआय चांगले काम करते; मात्र ज्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असतो, त्या वेळी सीबीआय तेवढी चांगली कामगिरी दाखवू शकत नाही आणि न्यायालयात ते प्रकरण पाहिजे त्या क्षमतेने तडीस जाऊ शकत नाही, असा टोमणाही गोगोई यांनी या वेळी सीबीआयला मारला. गोगोई यांनी जन आदेशांना आंतरराज्य गुन्हे चौकशीसाठी समवर्ती सूचीमध्ये सूचीचा भाग बनवला पाहिजे असा सल्ला दिला. जन आदेश सध्या राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत.
सीबीआयच्या कामात कुठे न कुठे राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. सीबीआयला स्वायत्तता मिळावयास हवी, असे मत गोगोई यांनी या वेळी व्यक्त केले. सीबीआयमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी अनेकदा न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अंतर्गत भारत सरकार विरुद्ध विनित नारायण प्रकरणात निकाल दिल्याचे गोगोई यांनी सांगितले.