Breaking News

प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा : सभापती रामदास भोर

अहमदनगर/प्रतिनिधी
“नेत्रदान चळवळीला सक्रीय योगदान देऊन फिनिक्सने अनेक अंधांना नवदृष्टी देऊन प्रेरणादायी कार्य केले आहे. दृष्टी असेल तरच सर्वकाही असून, दृष्टीहीनांना ही सृष्टी दाखविण्यासाठी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. समाजासाठी काही देणे लागतो या भावनेतून आज काम करण्याची गरज आहे’’, असे प्रतिपादन नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी केले.
नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे फिनिक्स सोशल फौंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन व जागतिक अवयवदान सप्ताहनिमित्त  घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधूमेह व अवयवदान संकल्प शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सभापती भोर बोलत होते. कार्यक्रमास ग्राहक मंचाचे जिल्हा संघटक शब्बीर शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे माधव गायकवाड, प्रा.चंद्रकांत निक्रड, नीरज राठोड, ‘फिनिक्स’चे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.
प्रास्तविक जालिंदर बोरुडे यांनी केले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात 570 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 113 मोतीबिंदू  रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी नगरसह औरंगाबाद, परभणी, नाशिक, सोलापूर व बीड या जिल्ह्यातून नागरिकांनी हजेरी लावली होती. शिबिराला के.के.आय बुधराणी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शरद धाडगे यांनी केले. आभार सौरभ बोरुडे यांनी मानले.