Breaking News

वेस्ट इंडिजसमोर भारताचे 468 धावांचे आव्हान

भारताचे दुसर्‍या कसोटीवर वर्चस्व कायम मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरीची नोंद

जमैका
वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसर्‍या कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे या कसोटीत भारताने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 468 धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसर्‍या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे.
दुसर्‍या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1-1 बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद शमीने या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या 42 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे. सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणार्‍या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसर्‍या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहेत. दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आहे. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला इशांत शर्माने यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. यानंतर कॅम्पबेल आणि ब्राव्हो यांची छोटेखानी भागीदारी रंगली. यानंतर विराट कोहलीने तात्काळ मोहम्मद शमीला गोलंदाजी देत, विंडीजला धक्का दिला. शमीने कॅम्पबेलला कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. अखेरीस तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 45 धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही 423 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात जमैका येथे सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. इशांत शर्माने क्रेग ब्रेथवेटला यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडत विंडीजला पहिला धक्का दिला. या बळीसह इशांत शर्मा, कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इशांतने माजी कर्णधार कपिल देव आणि जलदगती गोलंदाज झहीर खान यांचा विक्रम मोडीत काढला. सध्या या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे 200 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही 423 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.