Breaking News

महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसांचा अंदाज

Rain clipart
मुंबई
 राज्यात मुंबई, कोकणसह विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कालपासून मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. नांदेडमधील धरण 100 टक्के भरले आहे. येथील पाण्याचा मोठा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. परभणी, हिंगोली, गोंदिया येथेही चांगला पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरांत ठाणे, कल्याण, डोंबिवली भिवंडी, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा परिणाम मध्य रेल्वे सेवेवरही झाला असून, रेल्वे गाड्या 15 मिनिटे उशिरा धावत आहेत. आगामी 48 तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.