Breaking News

महाराष्ट्राचे राज्यपाल राव यांना निरोप

मुंबई  / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निरोप देण्यात आला. मुंबईत राजभवन झालेल्या एका साध्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. विद्यासागर राव यांच्या ऐवजी आता भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. उद्या नवे राज्यपाल पदभार स्वीकारणार आहेत. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्यातील जनतेचे आभार मानले.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राव यांना राजभवनावर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.फडणवीस यांनी राव यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्निक हैदराबादकडे रवाना झाले. या वेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजेय मेहता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलिस आयुक्त संजय बर्वे, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.