Breaking News

एकदंत मंडळाच्या वतीने ‘होम मिनिस्टर स्पर्धा’

अहमदनगर/ प्रतिनिधी
सुडकेमळा येथील एकदंत मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘होम मिनिस्टर’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. अत्यंत रंगतदार होत गेलेल्या या कार्यक्रमात सारिका साखरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर सर्वच महिलांनी जल्लोष केला. विजेत्या साखरे यांना मंडळाच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आशा सावंत यांनी मिळविला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सौरभ सुडके यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमास राहुल पारकड, आशा सावंत, निर्मला पारकड, उषा सुडके, स्वाती सुडके, उर्मिला धेंड, कांता लांडगे, छाया रासकर, निशा सुडके, ताराबाई साखरे, प्राजक्ता रासकर, वर्षा रासकर, लता जाधव, डॉ.सुनीता व्यवहारे, डॉ.अमृता पारकड,  प्रतीक हेगडे आदी उपस्थित होते.