Breaking News

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरूद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ

मुंबई
चुनाभट्टी सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासासासाठी अनुभवी अधिकार्‍यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले. त्यात तरुणीच्या नातेवाईकांना जातीवाचक अपशब्द वापरले म्हणून चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाने यापुर्वीच चुनाभटटी पोलिसांना नोटीस बजावत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या विषयी पोलीस आयुक्त बर्वे यांचीही भेट घेत चर्चा केली. त्यावेळी सहआयुक्त विनोयकुमार चौबे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त लखमी गौतम, परिमंडळ सहाचे उपायुक्त शशी मिना आणि तपास अधिकारी उपस्थित होते. नोंद गुन्हयाच्या तपासासाठी पाठपुरावा करणारे पिडीत तरुणीच्या कुटुंबियांना चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील महिला तपास अधिकारी आणि औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी नीट वागणूक दिली नाही, हे मुद्दे आयोगातर्फे रहाटकर यांनी या बैठकीत मांडले. या आरोपांची चौकशी करून संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी, असेही आयोगाने यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत पिडीत तरुणीच्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या भावाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी रहाटकर यांनी केली. याशिवाय पिडीत तरुणीच्या मृतदेहाची शवचिकित्सा घाटी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी करावे, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, अशा सूचनाही आयोगाने केल्या. त्यानुसार विशेष पथक नेमण्यात आले. दूसरिकडे, मृत मुलीच्या भावाच्या तक़्रारीवरून, 6 ऑगस्ट रोज़ी दुपारी 2 ते तीन च्या सुमारास तपासाबाबत विचारणा करण्यासाठी ते गेले असताना सूर्वे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जातीवरूनही हीणवल्याची तक़्रार त्यांनी केली आहे. त्यानुसार, सुर्वेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणख़ीनच चिघळले आहे.