Breaking News

मोरया प्रतिष्ठानची शहरातून पारंपरिक मिरवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी 
येथील खाकीदास बाबा मठ, लालटाकी परिसरातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.2) शहरातून श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेची पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत पुरुष पांढरे कपडे व फेटे तर महिला-युवती भगवे फेटे व गुलाबी साड्या परिधान करुन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
घोड्यांच्या रथात असलेली श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती, भगव्या ध्वजासह लहान मुलांचा सहभाग, महिला-पुरुषांचे संगीताच्या तालावरील नृत्य हे सर्व मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल चत्तर, उपाध्यक्ष बाळासाहेब आगळे, गोपाळराव ढगे, चंद्रकांत मेहेत्रे यांचे मिरवणुकीस मार्गदर्शन लाभले.