Breaking News

गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण

अहमदनगर/प्रतिनिधी
शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर येथे विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने गुरुवारी (दि.12) सकाळी 8 वा. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ‘श्रीं’च्या मूर्तीची उत्थापन पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथम मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
या मिरवणुकीत अग्रभागी नगार्‍याची बैलगाडी, सावता माळी महिला मंडळाचा दांडिया, रिद्म ढोलपथक, बुर्‍हाणनगर येथील शिवकृपा कडेपथक, हलगीपथक, लेझीमपथक, झांजपथक आदी सहभागी होणार आहेत. तसेच सकाळी 11 वा. रामचंद्र खुंट येथून विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मिरवणुकीस मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
ही विसर्जन मिरवणूक माळीवाडा येथून सकाळी 9.30 वा. निघणार असून 10 वा. रामचंद्र खुंट, 11 वा. दाळमंडई, 11.30 वा. तेलीखुंट चौक, 12 वा. घासगल्ली चौक, 12.45 वा. भिंगारवाला चौक, 1.30 वा. अर्बन बँक चौक, 2.15 नवीपेठ कॉर्नर, 3 वा. विशाल इलेक्ट्रॉनिक्स, नवीपेठ, 3.30 वा. नेता सुभाष चौक, 4 वा. जिल्हा वाचनालय, 4.30 वा. चितळेरोड पोलिस चौकी, 5 वा. चौपाटी कारंजा दत्तमंदिर, 5.30 वा. शमी गणपती, 6 वा. दिल्लीगेट वेशीबाहेर जाईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी दिली.
मिरवणूक यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, सहसचिव रामकृष्ण राऊत, उत्सव समितीप्रमुख बाबासाहेब सुडके, खजिनदार पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, हरिश्‍चंद्र गिरमे, भाऊसाहेब फुलसौंदर, चंद्रक़ांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्‍वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, शिवाजी शिंदे, प्रकाश बोरुडे, महंत योगी संगमनाथ महाराज प्रयत्नशील आहेत.