Breaking News

‘साहो’ नंतर प्रेमकथेत काम करणार प्रभास

हैदराबाद
बाहुबली आणि साहो सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर प्रभास यांच्या पुढच्या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षाच्या कालावधी नंतर ‘साहो’ 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. बाहुबली नंतर साहो हा प्रभासचा पहिलाच चित्रपट असून जवळपास 2 वर्षाच्या कालावधीनंतर प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. साहोत हॉलिवूड सिनेमासारखे भरपूर ऍक्शन सीक्वेन्स केल्यानंतर प्रभास आता एक प्रेमकथा करणार आहे. याबाबत खुलासा स्वतः प्रभासनेच केला आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात प्रभास एका प्रेम कथेत दिसणार आहे. चित्रपटाचे जवळपास 30 दिवसांचे चित्रीकरण झाले असून बहुतांश चित्रीकरण युरोपमध्ये होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ अभिनेते आणि प्रभासचे काका कृष्णम् राजू यांच्या गोपीकृष्ण मुव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात यु व्ही क्रीएक्शन सुद्धा सहभागी होणार आहे. राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात  पूजा हेगडे प्रभास सोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे साहो दिग्दर्शक सुजीत रेड्डी प्रमाणेच राधा कृष्ण कुमार सुद्धा युवा दिगदर्शक असून ’जिल’ हा एकच चित्रपट यापूर्वी दिग्दर्शित केला आहे. साहोला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे प्रभासच्या आगामी चित्रपटाकडे सांगण्याचे लक्ष लागले आहे.