Breaking News

हजारो वर्षांपूर्वीच्या सांगाड्याजवळ सापडली आयफोनसदृश्य वस्तू

सिबेरिया/वृत्तसंस्था
रशियातील सिबेरिया येथे पुरात्त्वशास्रज्ञांना 2100 वर्षांपूर्वीच्या सांगाड्याजवळ आयफोनसदृश्य वस्तू आढळून आली आहे. परंतु हि वस्तू आयफोन नसून नेमकी काय आहे यावर संशोधन चालू आहे.

 पुरात्त्वशास्रज्ञांच्या एका टीमने 2 हजार 137 वर्षांपूर्वीचा एका हाडांचा सापळा शोधला आहे. या हाडांच्या सांगाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, याच्या जवळ आयफोन सारखी एक वस्तू सापडली आहे. मात्र आयफोन नाहीये. मात्र सांगाड्याजवळ सापडलेली या गोष्टीची बनावट एकदम आयफोन सारखी आहे.

 या सांगाड्याला पुरात्त्वशास्त्रज्ञांनी नताशा नाव दिले असून, ती प्राचीन फॅशानिस्टा आहे. पुरात्त्वशास्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा सांगाडा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. प्राचीन मंगोलियामधील जिओनाग्रू काळातील हा हाडांचा सांगाडा आहे. हा महिलेचा सांगाडा आहे.

 या महिलेच्या हाडाच्या सांगाड्याडवळ स्मार्टफोन सारखी गोष्ट सापडली आहे. मात्र हा कोणताही स्मार्टफोन नसून, दगडाचा एक भाग आहे. व यामध्ये किंमती दगड बसवण्यात आलेले आहे. या दगडात जे छोट छोटे दगड लावण्यात आले आहेत ते कारेलियन, फेरोजा आणि मोती आहेत. त्यामुळे या दगडाची किंमत आयफोन पेक्षाही अधिक आहे.