Breaking News

अ‍ॅड. आंबेडकरांकडून जनतेची दिशाभूल : नबाब मलिक

Nawab Malik
मुंबई / प्रतिनिधी
लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
अ‍ॅड. आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्‍न विचारला असता मलिक यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, की अ‍ॅड. आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे होती आणि आताही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली, ती चूक पुन्हा विधानसभेत ते करणार नाहीत, असेही मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत एकजुटीने लढतील आणि जे मित्रपक्ष सोबत होते, ते सर्व घेवून विधानसभा ताकदीने लढवणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.