Breaking News

ग्रंथालय पुरस्कार जाहीर

अहमदनगर/ प्रतिनिधी

  येथील दीपा निसळ सार्वजनिक ग्रंथालयास राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या पुरस्कारासाठी निसळ ग्रंथालय जिल्ह्यातून मानकरी ठरले आहे. निसळ सार्वजनिक ग्रंथालयास २०१७-१८ चा शहरी विभागासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ३० हजार रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुजर गल्ली येथे या ग्रंथालयाची विनामूल्य या तत्त्वावर १९९९ मध्ये स्थापना झाली.