Breaking News

चिदंबरम यांना तिहारमध्ये पाठविण्याची सीबीआयची मागणी

नवीदिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तिहार कोठडीत पाठवा, अशी मागणी आता सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सीबीआयला चिदंबरम यांची कोठडी नको आहे. त्यांना तिहारमधील तुरुंगात न्यायालयीन कोठडी देऊन पाठवावे, असे सीबीआयने म्हटले आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाने मात्र पाच सप्टेंबरपर्यंत चिदंबरम यांची सीबीआय कोठडी कायम ठेवली आहे.

सोमवारी झालेल्या घडामोडींमध्ये पी. चिदंबरम यांना अंशतः दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने तिहार तुरुंगात चिदंबरम यांची रवानगी करू नये, असे म्हटले. तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवा, असा प्रस्ताव चिदंबरम यांनी न्याायालयाला दिला होता. त्यानंतर आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायलयाने म्हटले होते. आता याच संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करावी असे म्हटले आहे. तूर्तास तरी सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना पाच सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे; मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायलय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरून सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे