Breaking News

पंकजाचा आठशे कोटींचा दारूचा कारखाना

विधान परिषदेचा धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप ; मुंडे भावंडातला वाद विकोपाला

बीड / प्रतिनिधी
परळीत झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, की आमच्या बहिणाबाईकडे काहीही कमी नाही. त्यांच्याकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. हा दारूचा कारखाना साधासुद्धा नाही, आठशे कोटींचा आहे. मग काय कमी आहे का, असा सवाल त्यांनी केला. एवढी श्रीमंती असताना शेतकर्‍यांचे पैसे कशाला ठेवता असा सवाल त्यांनी पंकजा यांना केला. धनंजय यांच्या या आरोपावर पंकजा यांनी अजून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्या या आरोपांना काय उत्तर देतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

उद्या येणार्‍या निवडणुकीत तेच पैसे खर्च केले जातील. त्यांनी अर्धे पैसे लोकसभेला खर्च केले राहिलेले विधानसभेसाठी खर्च करतील, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता. धनंजय म्हणाले, की पंकजा सहा आठ इथे येतात. येऊन बचत गटाच्या महिलांना नादी लावले जाते. दुष्काळात गायी वाटल्या जात आहेत. गायी चारा आणि खुराक, निघालेले दूध याचा ताळमेळ बसत नसताना त्यात दुधाला भाव कमी आहे. दुष्काळात खायला चारा नाही आणि गायी वाटप सुरू आहे. मायबाप शेतकर्‍याला आहे ती जनावरे सांभाळणे होत नाही. त्याला आगोदर चारा द्या असे म्हणत बिसलरीच्या पाण्याची बाटलीची किंमत जास्त आहे; मात्र दुधाचा भाव कमी त्यामुळे आगोदर दुधाचा भाव वाढवा अशी मागणीही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, पंकजा यांना शेतकर्‍यांचे जीवन कळलेच नाही. त्या फक्त निवडणुकीपुरतेच इथे येतात. समाजसेवा कशी करायची, ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि स्व. पंडित अण्णांनी मला शिकवले. कारण मी त्यांच्यासोबत सावलीसारखा होतो, आमच्या बहीण बाईं नाही. तीच परंपरांना चालवायची म्हणून आशीर्वाद द्या.

आमच्या बहीणबाई झोपलेल्या
सत्तेत असून एकही उद्योग आणला नाही तसेच पावनभूमी क्रांतीस्थळ परळी येथील बारा ज्योतिर्लिंग वैद्यनाथ देवस्थानचा ज्योतिर्लिगचा दर्जा केंद्र सरकारने काढून टाकला. त्या वेळी आमच्या खासदार ताई  कुठे होत्या. देव पळवून नेला, तरी आमच्या बहीणबाई झोपलेल्या होत्या, असा टोला धनंजय यांनी लगावला.