Breaking News

विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान फोटो

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी

 कुत्र्याची शिकार करत असताना विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहीरीत पिंजरा सोडून जेरबंद केला. डिग्रस येथील नर्सरीत त्याच्यावर उपचार करण्यात आले.

   सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लहानबाई संजय वरखडे या शेतात चारा काढण्यासाठी गेल्या. चारा काढीत असताना विहीरीतून बिबट्याच्या गुर गुरण्याचा व डरकाळीचा आवाज आल्याने लहानबाई यांनी विहीरीत डोकावून पाहीले असता विहीरीतील कपारीवर बिबट्या दिसला. त्यांनी पती संजय वरखडे यांना बिबट्याची माहीती दिली. त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना माहिती दिली. त्यांनी  वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवले.

   घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गोरक्षनाथ लोंढे, सचिन गायकवाड, वामन लांबे, बाळासाहेब दिघे, जयराम सागर, प्रदीप कोहकडे,लक्ष्मण किनकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने विहीरीत पिंजरा सोडून बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकरी व नागरीक जगन्नाथ वरखडे, कारभारी वरखडे, मंजाबापू वरखडे,प्रदीप नालकर, अभिजित नालकर, बाळासाहेब वरखडे, मयुर मोरे, संदीप कदम, सुनिल खांदे, राजेंद्र मोरे, सतीश वाजे, आदेश जाधव, मनोज डोंगरे आदींनी मदत केली.