Breaking News

भारत-रशियाच्या हातमिळवणीमुळे दोन्ही देशांचा विकासः मोदी

मॉस्को
भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी हातमिळवणी केल्याने दोन्ही देशांचा विकास होतो आहे. विकासाचे नवे आयाम जोडण्याचे काम दोन्ही देशांच्या हातमिळवणीमुळे झाले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

मोदी हे रशियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. पुतीन यांनी रशियात आपल्याला बोलवल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. पुढच्या वर्षी होणार्‍या शिखर परिषदेसाठी पुतीन यांना मोदी यांनी निमंत्रित केले आहे. सुरक्षा क्षेत्र, कृषी क्षेत्राबाबतचे महत्त्वाचे करार आणि चर्चा पुतीन आणि मोदी यांच्यात झाले.

दोन्ही देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये भारत आणि रशिया हे दोन्ही देश इतरांचा हस्तक्षेप पसंत नाही, हेदेखील मोदी यांनी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमधून कलम370 हटवल्याबद्दल भारताचे रशियाने अभिनंदन केले होते. तसेच भारताने उचलेले हे पाऊल योग्य असल्याचेही म्हटले होते. हाच धागा पकडून मोदी यांनी दोन्ही देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये इतर कोणत्या देशाची ढवळाढवळ पसंत केली जाणार नाही, हेदेखील स्पष्ट केले. मोदी यांचा रोख अमेरिकेकडे होता.