Breaking News

काश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

जम्मू
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढवून शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. खोर्‍यात घुसखोरी करणार्‍या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी जिवंत पकडले आहे. त्यांच्या कबुलीचा व्हिडिओ लष्कराने बुधवारी सार्वजनिक करून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याचे उघड झाले आले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने केला जात आहे. हा पाकिस्तानचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. जवानांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यांच्या कबुलीचा व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. हे दहशतवादी पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याची माहिती मिळाली आहे. ‘काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. 21 ऑगस्टला दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडले असून, ते लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत,’ अशी माहिती लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल के.जे. एस. ढिल्लन यांनी दिली.

लष्कराने या दोन्ही दहशतवाद्यांचा व्हिडिओ सार्वजनिक करून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. ते दोघे पाकिस्तानी नागरिक असून, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याची कबुली देत असताना या व्हिडिओत दिसतात. मोहम्मद अजीम असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानातील रावळपिंडी येथून आला असून, लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.