Breaking News

भिंगारमध्ये पाच दिवसांपासून निर्जळी

भिंगार/प्रतिनिधी
 शहरात पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाचे दिवस असले तरी नगर परिसरात पाऊस कमी झालेला आहे. असे असले तरी  नगर व भिंगार शहराला मुळा डॅम येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही पाणीपुरवठा का होत नाही, या बाबत शका आहे.
नगर शहरापेक्षा भिंगार शहरातील नागरिकांना पाणीपट्टी जादा दराने आकारण्यात येते, तरीही भिंगारचे नागरिक पाण्याची अवाजवी पाणीपट्टी निमूटपणे भरतात. असे असूनही पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.
मुळा धरणातून पाणी एमआयडिसीपर्यंत येते व एमआयडीसीकडून भिंगार शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होतो. पाण्याची पाइपलाइन कोठेही लीक नसून व वीजही व्यवस्थित चालू असताना शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ऐन बैल पोळा, गौरी-गणपती सणाला नाही.
सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे पाण्याअभावी कोणतीच कामे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रथम पाण्याची आवश्यकता भासते. त्यातच अचानकपणे शहर व परिसरातील पाणी पुरवठा पाच दिवस बंद असल्यामुळे कारणामुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिला वर्गामध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असताना ते मिळत वेळेवर नसल्यामुळे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
या बाबत सर्वपक्षीय भिंगारकर नागरिकांसह पाणीपुरवठा व्यवस्थित, नियमित न झाल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पवार यांना पाणीप्रश्‍नावर घेराव घालण्याच्या तयारीत आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाने पाणीप्रश्‍न त्वरीत सोडवावा, तसेच  कॅन्टोन्मेंट बोर्डाने या समस्येची दखल घेऊन सणासुदीला नागरिकांची गैरसोय करू नये, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.