Breaking News

देशव्यापी मतदार पडताळणी अभियानास सुरवात

नवी दिल्ली
व्यापक निवडणूक सुधार कार्यक्रमच्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाने आजपासून देशव्यापी मतदार पडताळणी तसेच नोंदणी अभियानास सुरवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मतदार यादीतील चुका दूर करणे तसेच मतदान यादीत योग्य बदल करून नागरिकांना उत्तम सेवा पुरविणे हा आहे. मुख्य निवणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचे हे अभियान 1 सप्टेंबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या देशव्यापी उपक्रमात मतदार ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे स्थायिक बूथ केंद्रांना भेट देऊन मतदार यादीतील आपले नाव शोधू शकता तसेच काही चुका आढळल्यास बरोबर माहिती भरू शकतात. जवळपास 10 लाख केंद्रांद्वारे या अभियानाची सुरवात होणार आहे. मतदार पडताळणी अभियानासाठी सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 32 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा स्तरावर 700 अधिकारी आणि एक मिलियन मतदार केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे. नागरिक www.nvsp.in या संकेत स्थळावर भेट देऊन आपली माहिती तपासू शकतात.