Breaking News

बालहुतात्मा शिरीषकुमारप्रमाणे राष्ट्रभक्ती बाळगावी

अहमदनगर/प्रतिनिधी
“स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी भाग घेऊन हौतात्म्य पत्करले. त्यात शिरीषकुमार या छोट्या बालकाचाही समावेश आहे. लहानवयातच इंग्रजांच्या अत्याचाराशी लढत त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्याप्रमाणेच आजच्या विद्यार्थ्यांनीही राष्ट्रभक्ती बाळगावी, जेणेकरुन आपला भारत देश महान होईल’’, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा.नवनाथ आव्हाड यांनी केले.
हुतात्मा स्मरण प्रबोधन मंचच्या वतीने कुतुबुद्दीन शेख यांनी मुकुंदनगर येथील गाडे विद्यालयात बाल हुतात्मा शिरीषकुमार यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त इतिहास संशोधक प्रा.नवनाथ आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक हेमंत बल्लाळ होते. यावेळी मुख्याध्यापक एच.सी.बनकर, अशोक जोशी आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्तविकात कुतुबुद्दीन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गुंड यांनी केले तर आभार डॉ.निशात शेख यांनी मानले.