Breaking News

धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर/प्रतिनिधी
गेल्या 35 वर्षांपासून नर्मदा घाटीमध्ये धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चालू असलेल्या नर्मदा बचावच्या कार्यकर्त्यां मेघा पाटकर यांच्या समर्थनार्थ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्र सेवा दल नगर जिल्हा दक्षिण विभाग व समविचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरुन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात प्रशासनाने विस्थापितांवर सातत्याने अन्याय केला असून गेल्या अनेक वर्षापासून धरणग्रस्तांच्या अनेक मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भातील असंख्य मुद्यांवर या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्य मंडळाच्या सदस्य अनघा राऊत, संघटक बापू जोशी, ‘अध्यापक सभे’च्या सुरेखा आडम, ‘जिज्ञासा’चे विठ्ठल बुलबुले, सोन्याबापू कुसळे, भालचंद्र आपटे, दत्ताजी दिकोंडा, आयुषा जाधव, पुरुषोत्तम जाधव, सागर कोटा आदी उपस्थित होते.
या निवेदनावर राष्ट्रसेवा दल, समाजवादी अध्यापक सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिज्ञासा अकादमी, युवान, सावली, रेहमत सुलताना फौंडेशन यांच्या समर्थनार्थ सह्या व पाठिंबा आहे.