Breaking News

ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण

आरोग्य विभागाकडे उपाययोजनांची मागणी


dengyu
कोपरगाव / ता. प्रतिनिधी
कोपरगाव शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना आता या आजाराने ग्रामिण भागात देखील शिरकाव केला आहे. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयातील यंत्रणा अपुरी पडत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. आरोग्य विभागाने या कडे लक्ष पुरवून उपाययोजना कराव्यात

अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 कोपरगाव तालुक्यातील येसगाव, खिर्डी गणेश, नाटेगाव, करंजी, पढेगाव आदी ठिकाणी डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त अनेक रुग्ण उपचार घेत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी मागिल आठवड्यात संपर्क साधूनही कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. तर कोपरगावचे आरोग्य अधिकारी डॉ. विधाटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत कल्पनाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

 सध्या अनेक गावांत तापाची कणकण, हात पाय ठणकणे आदी लक्षण असणारी रुग्ण आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची माफक अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त होत आहे. ग्रामसेवकाची संपावर असल्याने गावातील तणनाशक व धूर फवारणी आदी कामांसाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतचा समन्वय राखणे कठीण झाले आहे. तरी आरोग्य विभागाने याकडे लक्ष पुरवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.