Breaking News

४ कोटींचे कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

संगमनेर/प्रतिनिधी

संगमनेर बाजार समितीमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी ८५ लाख रुपयांचे कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा झाले आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व उपसभापती सतीश कानवडे यांनी दिली आहे.

   सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल अतिशय कवडीमोल भावाने विक्री होत होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक मदतीची शासनाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मागणी होती. या कामी आंदोलने झाली होती. याची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने प्रथम १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीसाठी दोन रुपये प्रति किलो दराने २ कोटी ५२ लाख रुपयांचे अनुदान मंजुर केले होते. त्यानंतरही कांदा दरात वाढ न झाल्यामुळे शासनाने दि.३१ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले होते. संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या ५ हजार १९८ शेतकऱ्यांना सुमारे ३ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. अशी माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.

   खात्रीशिर विक्रीची बाजारपेठ म्हणुन संगमनेर बाजार समितीचा अल्पावधित नावलौकीक झालेला आहे. त्यामुळे निर्यातक्षम मालाचा पुरवठा करणारी बाजारपेठ म्हणुन देशात संगमनेर बाजार समितीचे नाव घेतले जाते. संगमनेरसह