Breaking News

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा मतदारसंघांची चाचपणी

अहमदनगर/प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्यामुळे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मायक्रो ओबीसी व व्ही.जी.एन.टी. राज्य समितीचा नगर दौरा नुकताच झाला. बारा बलुतेदार ओबीसी संघाचे प्रतिनिधी हजर होते. वंचित बहुजन आघाडी मायक्रो व व्ही.जी.एन टी. राज्य समितीमध्ये भीमराव दळे, प्रदेश  सचिव वंचित बहुजन आघाडी गोविंद दळवी, प्रदेश प्रवक्ता तथा महासचिव संदीप वने, नांदेड जिल्हा अध्यक्ष समन्वय विद्यार्थी आंदोलन इत्यादी प्रतिनिधी हजर होत.
राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये भारीप जिल्हा अध्यक्ष अशोकराव सोनवणे यांच्या बरोबर आगामी विधानसभा निवडणूकबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिल्हा महासचिव दिलीप साळवे, बारा बलुतेदार संघटना कुंभार समाज अध्यक्ष विनय देवतरसे, राधाकृष्ण वाकचौरे, विश्‍वकर्मा पांचाळ सुतार समाज सचिव  अ‍ॅड. भानुदास होले, सुभाष नेमाने, माळी सेवा समाज संघ अ‍ॅड. धनंजय ठाणगे, सी.एस.पाटील मराठा सेवा संघ शंकरराव मोरे नाभिक समाज नेते जालिंदर  वाल्हेकर लहुजी सेना अ‍ॅड.महेश शिंदे माळी समाज पोपट बनकर, नितीन घोडके जिल्हा संघटक भारिप बहुजन महासंघ शालीग्राम राऊत सुतार समाज इ. प्रतिनिधी हजर होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नगर शहर मतदार संघाच्या विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी पुढील धोरणे काय असतील, याबाबत नियोजन व चर्चा झाली.