Breaking News

राष्ट्रपती कोविंद यांना हवाई प्रवेश नाकारला; पाकिस्तानची मुजोरी

इस्लामाबाद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत; मात्र पाकिस्तानने कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोविंद हे सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी परवानगी भारताने मागितली होती; पण पाकिस्तानने ती नाकारली, असे कुरेशी यांनी सांगितले. या निर्णयाशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेदेखील सहमत आहेत. काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.