Breaking News

शुभमन गिल करणार आफ्रिकेविरूद्ध भारतीय संघाचं नेतृत्व

मुंबई
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणार्‍या भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. चार कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. या सामन्यात शुभमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे.
वेस्ट इंडिज दौर्‍यात शुभमन गिलची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे शुभमन गिलची निवड न झाल्यामुळे, अनेकांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली होती.  आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल भारत अ संघाचं नेतृत्व करणार आहे. 9 सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरम येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. याचसोबत 17 सप्टेंबरपासून मैसूर येथे खेळवण्यात येणार्‍या दुसर्‍या सामन्यासाठी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाकडे भारताचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दोन्ही कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आहे. सध्या सुरु असलेल्या दुलिप करंडक स्पर्धेत अंतिम सामना खेळणार्‍या खेळाडूंना दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघात जागा देण्यात आली आहे.

पहिल्या 4 दिवसीय कसोटीसाठी भारत अ संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, अंकित बावने, के.एस. भारत (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौथम, शाहबाज नदीम, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शिवम दुबे, विजय शंकर

दुसर्‍या 4 दिवसीय कसोटीसाठी भारत अ संघ -
प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इश्‍वरन, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक आणि कर्णधार), कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, विजय शंकर, शिवम दुबे, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान